Home Social जेसीआय चंद्रपूर गरिमा समर कॅम्प यशस्वीरित्या संपन्न

जेसीआय चंद्रपूर गरिमा समर कॅम्प यशस्वीरित्या संपन्न

122

जेसीआय चंद्रपूर गरिमा समर कॅम्प यशस्वीरित्या संपन्न

 

 

चंद्रपूर : जेसीआय चंद्रपूर गरिमा संस्थेने दरवर्षीप्रमाणेच यंदाही समर कॅम्पचे यशस्वी आयोजन केले. दिनांक १५ ते २० एप्रिल दरम्यान चंद्रपूर शहरातील मॅक्स शोरूमच्या वरच्या पाचव्या मजल्यावर हा सहा दिवसीय कॅम्प पार पडला. मुलांना नवीन कलाकौशल्ये शिकवणे आणि त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करणे हा कॅम्पचा मुख्य उद्देश होता.

मुलांचा उत्साह पाहून संस्थेला नवीन व अधिक उत्तम उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळाली.

 

 

 

या कॅम्पच्या यशस्वी आयोजनात प्रोजेक्ट डायरेक्टर्स जे.सी. कल्याणी कंचारलावार, जे.सी. सोनाली डामले, जे.सी. श्वेता राठी, जे.सी. स्नेहिल काबरा, जे.सी. दीपाली खजांची आणि जे.सी. दीपिका सारडा यांच्यासह सचिव जे.सी. सोनिका बजाज यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच सदस्य जे.सी. संजना यादव, जे.सी. कल्पना चावडा, जे.सी. श्वेता तेला तसेच माजी अध्यक्षा जे.सी. स्वाती पुगलिया, जे.सी. गौरी लोढा आणि जे.सी. सारिका गांधी यांचे विशेष सहकार्य मिळाले. याशिवाय फर्स्ट लीप स्कूलच्या प्राचार्या नेहा ताहिलयानी आणि शिक्षिका स्नेहा यांचेही अमूल्य सहकार्य लाभले.

 

 

 

कॅम्पमध्ये कला आधारित विविध कार्यशाळा घेण्यात आल्या. यात पॉटरी मेकिंग (मातीची भांडी बनवणे), टोट बॅग पेंटिंग, स्टील बॉटल पेंटिंग, सॅंड आर्ट (वाळू कला), टेबल मॅनर्स व शिष्टाचार तसेच ब्रेन व एकाग्रता वाढविणारे खेळ यांचा समावेश होता. या उपक्रमांसाठी मास्टर ट्रेनर्स यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यांच्या सोबत जे.सी. ममता बजाज, जे.सी. अपेक्षा राजा आणि प्रीती नवघरे यांनी मुलांना कौशल्यांचे प्रशिक्षण दिले.

 

 

आपल्या पाल्याला कॅम्पमध्ये पाठवल्याबद्दल सर्व पालकांचे संस्थेने आभार मानले. हा कॅम्प अध्यक्षा जे.सी. पूजा मुंधडा यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here