Home Business अखेर हंसराज अहीर यांच्या पाठपुराव्याला यश, लोकमान्य टिळक-बल्लारशाह एक्सप्रेस आता आठवड्यातून दोनदा...

अखेर हंसराज अहीर यांच्या पाठपुराव्याला यश, लोकमान्य टिळक-बल्लारशाह एक्सप्रेस आता आठवड्यातून दोनदा धावणार

8

अखेर हंसराज अहीर यांच्या पाठपुराव्याला यश, लोकमान्य टिळक-बल्लारशाह एक्सप्रेस आता आठवड्यातून दोनदा धावणार

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाषांमध्ये आनंद, अहीरांचे मानले आभार

 

 

 

चंद्रपूर: पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे पूर्व अध्यक्ष हंसराज अहीर यांना दिलेल्या भरीव आश्वासनाची पुर्तता करीत केंद्रीय रेल्वेमंत्री मा. अश्विनी वैष्णव यांनी लोकमान्य टिळक-बल्लारशाह एक्सप्रेसला आठवड्यातून दोनदा चालविण्यास मंजुरी देऊन चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर मुंबई करीता प्रवास करणाऱ्या विदर्भातील रेल्वे प्रवाशांना मोठी सोय करून दिल्याबद्दल हंसराज अहीर यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांचे जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी व रेल्वे प्रवासी संघटनांच्या वतीने आभार मानले आहे.

 

मागील काही कालावधीपासून हंसराज अहीर यांनी ट्रेन नं. 20107 / 20108 एलटीटी-बल्लारशाह ही एक्सप्रेस आठवड्यातून दोनदा चालविण्यात यावी यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची अनेकदा भेट घेत मागणी केली होती. रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही अहीर यांच्या नेतृत्वात रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन मुंबई करीता अन्य थेट गाडी नसल्याने एलटीटी-बल्लारशाह ही गाडी आठवड्यातून किमान दोन वेळा चालविण्यात यावी अशी आग्रही मागणी केली होती.

 

या भेटी दरम्यान रेल्वेमंत्र्यांनी सदर गाडी आठवड्यातून दोन वेळा चालविण्याकरिता लवकरच मंजुरी प्रदान केली जाईल असे भरीव आश्वासन अहीर यांना या भेटीमध्ये दिले होते. अन्य मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द सुध्दा त्यांनी यावेळी दिला. दिलेल्या आश्वासनानुसार 20107 एलटीटी-बल्लारशाह एक्सप्रेस आता गुरूवार आणि रविवार असे दोन दिवस, तर 20108 बल्लारशाह-एलटीटी एक्सप्रेस शुक्रवार सोबतच आता सोमवारी सुध्दा धावणार आहे. यापुर्वी एलटीटी-बल्लारशाह गाडी बल्लारशाहला दु. 01.15 वाजता पोहचायची ती आता बल्लारशाह स्थानकात सुधारित वेळापत्रकानुसार दु. 12.55 वाजता पोहचेल. बल्लारशाह-एलटीटी एक्सप्रेस पुर्वीच्या वेळेपेक्षा लवकर पोहचणार आहे. त्यामुळे याचाही लाभ प्रवाशांना होणार आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे सेवा प्रवासीभिमुख व सुविधाकारक होण्याकरिता हंसराज अहीर व्यक्तिशः प्रयत्नशील असून त्यांनी प्रवासी तसेच स्थानिक रेल्वे प्रवासी संघटनांद्वारे होत असलेल्या मागण्यांची दखल घेत रेल्वेमंत्र्यांशी रेल्वे गाड्या व सुविधांविषयी प्रत्यक्ष भेटून मागणी केली असून रेल्वेमंत्री या मागण्यांच्या पुर्ततेकरिता सकारात्मक भुमिकेत असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

 

या औद्योगिक जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना सोयीच्या ठरणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वचनबध्द असल्याचा विश्वास अहीर यांनी व्यक्त केला आहे. बल्लारशाह-एलटीटी ही गाडी आठवड्यातून दोनदा सुरू करवून घेण्यात महत्वपुर्ण योगदान दिल्याबद्दल चंद्रपूर, गडचिरोली व अन्य जिल्ह्यातील प्रवाशांनी तसेच रेल्वे यात्री संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हंसराज अहीर यांची भेट घेऊन विशेष आभार मानले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here