Home Breaking News प्रियंका बोलत नाहीये, तिने मान टाकली…; फोन करून रचला बनाव, पण एका...

प्रियंका बोलत नाहीये, तिने मान टाकली…; फोन करून रचला बनाव, पण एका चुकीने अडकला

21

सात वर्षांनी मोठ्या असलेल्या आपल्या प्रेयसीचा मोबाइल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून करून त्याला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न आरोपी प्रियकराने केला.

 

 

 

 

 

 

 

 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर शहरात दुपारी घडलेल्या हत्येच्या घटनेनंतर रात्री आणखी एक धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आले आहे. सात वर्षांनी मोठ्या असलेल्या आपल्या प्रेयसीचा मोबाइल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून करून त्याला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न आरोपी प्रियकराने केला. मात्र वैद्यकीय अहवालामुळे हा बनाव उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

 

 

 

अंकेश योगेश बहीरवार (वय 22 रा. सोनापूर, ता. सावली) असे आरोपीचे नाव असून प्रियंका वांढरे (वय 29, रा. तुकूम) असे मृत तरुणीचे नाव आहे. प्रियंका पतीपासून विभक्त राहत होती. याच काळात तिची ओळख अंकेशशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघेही प्रियंकाच्या घरी वरच्या मजल्यावर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून क्षुल्लक कारणांवरून त्यांच्यात वाद सुरू होते. 14 मार्च 2026 च्या रात्री अंकेशने प्रियंकाच्या वडिलांना फोन करून “प्रियंका बोलत नाहीये, तिने मान टाकली आहे” असे सांगून घाबरवण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी वर जाऊन पाहिले असता प्रियंका बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

 

 

 

 

 

 

सुरुवातीला हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा संशय होता. मात्र गुरुवारी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालात प्रियंकाचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी अंकेशला ताब्यात घेतले. चौकशीत, प्रियंका आपल्यावर नियंत्रण ठेवते, घरच्यांशी बोलू देत नाही अशा किरकोळ कारणांवरून वाद होत असल्याचे आरोपीने सांगितले. याच कारणातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली दिली आहे.

 

 

पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेला मोबाइल चार्जर आणि एक्सटेन्शन बोर्ड जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1) अंतर्गत दुर्गापूर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here