Home Breaking News काँग्रेसच्या सृजन संघटन अभियानांतर्गत चंद्रपुर शहर व जिल्हाध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू.

काँग्रेसच्या सृजन संघटन अभियानांतर्गत चंद्रपुर शहर व जिल्हाध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू.

26

काँग्रेसच्या सृजन संघटन अभियानांतर्गत चंद्रपुर शहर व जिल्हाध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू.

 

 

 

अँकर:– काँग्रेस पक्षाच्या सृजन संघटन अभियानांतर्गत चंद्रपुर शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू होत आहे. याबाबतची माहिती अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक संतोष कोलकोंडा व एमपीसीसी सदस्य अभय छाचेड यांनी आज चंद्रपुरात पत्रकार परिषदेत दिली. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे व विद्यमान शहराध्यक्ष संतोष लहामगे उपस्थित होते. काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार देशभरात विविध राज्यांमध्ये सृजन संघटन अभियान सुरू झाले असून, त्याचा सातवा टप्पा महाराष्ट्रात सुरू आहे. या अभियानांतर्गत सर्व जिल्हा व शहराध्यक्षांची निवड होणार आहे. निवड प्रक्रियेत शिफारशींना प्राधान्य न देता तळागाळातील कार्यकर्त्यांची मते घेतली जातील. तालुका, विधानसभा व ब्लॉक पातळीवरील कार्यकर्ते, व संघटनांशी चर्चा करून मते घेतले जाईल. दोन्ही पदांसाठी अर्ज प्रसिद्ध झाले असून, इच्छुक उमेदवार हे पक्षाचे निष्ठावंत, चळवळीत सक्रिय व पक्षविचारधारेशी बांधील असणे आवश्यक आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तर्फे अंतिम घोषणा होईल. त्यानंतर चंद्रपुर शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांची घोषणा केली जाईल असे संतोष कोलकोंडा यांनी सांगितला.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here