Home Breaking News Chandrapur…..रयतवारी कॉलरी परिसरात मेफेड्रोन एम.डी. ड्रग्स विक्री करणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल,...

Chandrapur…..रयतवारी कॉलरी परिसरात मेफेड्रोन एम.डी. ड्रग्स विक्री करणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, १,९२,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.

102

Chandataknews

Chandrapur

चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलरी परिसरात मेफेड्रोन एम.डी. ड्रग्स विक्री करणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, १,९२,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.

 

चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील निमवाटीका रयतवारी कॉलरी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मेफेड्रोन (एम.डी.) नावाच्या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव विशाल रत्नाकर भोयर (वय २१, बगडखिडकी, चंद्रपूर), मो. फैज अब्दुल राशीद कुरेशी (वय २२, नुरी चौक, बगडखिडकी, चंद्रपूर)

 

 

त्यांच्याकडून एकूण २० ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्स, मोपेड वाहन, मोबाईल, व एकूण १,९२,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

या गुन्ह्याची नोंद रामनगर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अधिनियमान्वये करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे. या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी सहभागी होते.

 

या कारवाईमुळे चंद्रपूरमध्ये वाढत्या मेफेड्रोन ड्रग्सच्या दुष्परिणामांविरोधात पोलिसांचा दृढ उपाययोजना सुरू असल्याचे लक्षात येते. एम.डी. ड्रग्स विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करत असल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here