वाघाच्या हल्यात शेतकरी ठार, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मींथुर येथील घटना
हरिदास महादेव कुबडे मींथुर (५८) हे काल सकाळी शेतात मोहफुले वेचण्यासाठी गेले होते. मात्र, संध्याकाळ होऊनही ते परत आले नाही. त्यांना बघण्यासाठी त्यांचा पुतण्या संध्याकाळी शेतात गेला असता त्याला वाघाची जोडी आणि तीन बछडे दिसून आल्याने तो घाबरून गावात परत आला. ही माहिती वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्रीचे ९ वाजेपर्यंत शोधमोहीम राबविली, मात्र हरिदास यांचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे पोलिस व वनविभागाचा संशय बळावला असून, आज सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. शोध मोहीम दरम्यान शेतात शेतकऱ्यांचे मृतदेह सापडले.
एकूण ४ ते ५ वाघ असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. वन परिशेत्र अधिकारी बगमारे यांनी तात्काळ शव विच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले असून पुढील तपास वनविभाग आणि नागभीड पोलीस करत आहेत.





