Home Business इंडियन ऑलिम्पियाडमध्ये बल्लारपूर पब्लिक स्कूल येंनबोडीचे दोन विद्यार्थी राज्यात अव्वल क्रमांकात 

इंडियन ऑलिम्पियाडमध्ये बल्लारपूर पब्लिक स्कूल येंनबोडीचे दोन विद्यार्थी राज्यात अव्वल क्रमांकात 

28

 

बल्लारपूर/ येंनबोडी :

 

नुकत्याच पार पडलेल्या ‘ इंडियन ऑलिम्पियाड २०२६’ या प्रतिष्ठित स्पर्धेत बल्लारपूर पब्लिक स्कूल, येंनबोडी येथील

विद्यार्थांनी आपल्या बुद्धिमतेची चुणूक दाखवत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण ९९ विद्यार्थांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता . सांश राहुल रामटेके ( इयत्ता ४ थी ) याने गणित विषयात राज्यात चौथा क्रमांक पटकावला असून खुशी धनराज जांभूळकर ( इयत्ता ५ वी ) हिने गणित विषयात राज्यात सहावा क्रमांक पटकावला.

 

केवळ राज्य स्तरावरच नव्हे , तर इतर विद्यार्थ्यांनीही आपल्या उत्कृष्ट कामगिरीने शाळेचे नाव उंचावले. लावण्या मारोती बुटले, रुद्रम दिलीप मोरे , श्रावणी सुनील चौधरी आणि अद्विका आशिष भंडारकर या विद्यार्थ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘ एक्सेलेन्स अवॉर्ड ‘ देऊन गौरविण्यात आले.

 

विद्यार्थांच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक माननीय श्री. संजय वासाडे सर, तथा शाळेच्या संयोजिका प्रो.मेघा शुक्ला मॅडम, तथा शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना बाबुलकर मॅडम व इतर शिक्षक वर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून पालकांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here