Home Breaking News शेट्टी गँगचा अट्टल आरोपी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, १६ लाख ८०...

शेट्टी गँगचा अट्टल आरोपी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, १६ लाख ८० हजार रुपयांचे सोने जप्त.

34

शेट्टी गँगचा अट्टल आरोपी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, १६ लाख ८० हजार रुपयांचे सोने जप्त.

सावली व मुल परिसरातील २ घरफोडीचे गुन्हे उघडकीस, ११२ ग्रॅम सोने जप्त

 

 

 

 

चंद्रपूर शहरातील स्थानिक गुन्हे शाखेने नागपूरहून एका अट्टल घरफोडीचा आरोपी ताब्यात घेतला असून, सावली व मुल परिसरातील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून ११२ ग्रॅम सोने  जप्त करण्यात आले.

 

 

दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन सावली येथील अधिकाऱ्यांचे व अंमलदारांचे संयुक्त पथकाने प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर येथील दिघोरी भागातून शेठ उर्फ रमेश वेलादन शेट्टी या अट्टल आरोपीला ताब्यात घेतले. हा आरोपी मूळ चंद्रपूरचा रहिवासी असून, नागपूरमध्ये घरफोडी करत होता.

तपासादरम्यान आरोपीने दिलेल्या माहितीनुसार नागपूर येथील तीन सोनारांकडून पोलीस स्टेशन सावली येथील अपराध क्रमांक १०७/२०२५ कलम ३०५(अ), ३३१(४) भारतीय न्याय संहिता व पोलीस स्टेशन मुल अपराध क्रमांक २५२/२०२५ कलम ३०५(अ), ३३१(४) भारतीय न्याय संहिता अंतर्गत चोरीला गेलेल्या व विकलेल्या सोन्याच्या दागिन्याची लगड जप्त करण्यात आली. ही लगड एकूण ११२ ग्रॅम असून, तिचे मूल्य १६ लाख ८० हजार रुपयांचे आहे.

 

कारवाईचे मार्गदर्शन व पथक:

सुदर्शन मुम्मका, पोलीस अधीक्षक चंद्रपूर व ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल काचोरे, पी. नि. स्थानिक गुन्हे शाखा, प्रदीप पुलोटीवार, पी. नि. पोलीस स्टेशन सावली, दीपक कांकेडवार, सपोनि, बलराम झाडोकर, सपोनि, पो. उपनि. संतोष निंभोरकर, पो. उपनि. सर्वेश बेलसरे, विनोद भुरले, पो. उपनि., सचिन मुसळे, पो. उपनि., तसेच सफौ धनराज करकाडे, पोहवा चेतन गज्जलवार, सुरेंद्र मंहतो, मोहन दासरवार, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, प्रफुल्ल गारघाटे, अजित शेंडे, सुमित बरडे, धीरज पिडूरकर, अशोक मडावी, मिलिंद टेकाम, गजानन मडावी यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here