Home Business आरसीईआरटी चंद्रपूर येथे ‘ ‘आयपीआर फॉर इनोव्हेटर्स अँड एंटरप्रेन्युअर्स’’ या विषयावर मार्गदर्शनपर...

आरसीईआरटी चंद्रपूर येथे ‘ ‘आयपीआर फॉर इनोव्हेटर्स अँड एंटरप्रेन्युअर्स’’ या विषयावर मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन,

161

जिथे समस्या, तिथेच व्यवसायाची संधी -नाहीद एन. हुसेन 

राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आरसीईआरटी), चंद्रपूर येथील इन्स्टिट्यूट इनोवेशन कौन्सिल (आयआयसी) तर्फे ‘‘आयपीआर फॉर इनोव्हेटर्स अँड एंटरप्रेन्युअर्स’’ या विषयावर मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन

 

 

 

 

 

 

चंद्रपूर : ‘‘जिथे समस्या आहे, तिथेच व्यवसायाची संधी दडलेली असते. त्या संधीची ओळख करून कल्पनांना कृतीत उतरवणे आणि अचूक नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे,’’ असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ व विधी संशोधक नाहीद एन. हुसेन यांनी केले. चांगला व्यावसायिक बनण्यासाठी त्या क्षेत्रात पूर्णपणे रुजणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

सरदार पटेल मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आरसीईआरटी), चंद्रपूर येथील इन्स्टिट्यूट इनोवेशन कौन्सिल (आयआयसी) तर्फे ‘‘आयपीआर फॉर इनोव्हेटर्स अँड एंटरप्रेन्युअर्स’’ या विषयावर मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

या वेळी प्रमुख वक्ते म्हणून नाहीद एन. हुसेन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना विचारक्षमतेचा विकास करण्याचे आवाहन करून सांगितले की, जीवनात स्पष्ट उद्दिष्ट निश्चित करून सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. केवळ शिक्षण घेणे पुरेसे नसून, त्यातून कृतीशीलता निर्माण होणे महत्त्वाचे आहे. तसेच शिक्षण आणि वैयक्तिक तर्क यातील फरक अधोरेखित करत यशासाठी मेहनत, चिकाटी व योग्य दिशा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयआयसी अध्यक्षा डॉ. अंजुम कुरेशी यांनी केले, तर संचालन इशिका ताराचंद बेले यांनी केले. विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यशस्वी आयोजनासाठी डॉ. आर. के. कृष्णा, डॉ. प्रवीण मत्ते, प्रा. योगेश येनारकर, डॉ. पियाली चक्रवर्ती, प्रा. चेतन कारेकर यांचे सहकार्य लाभले. स्टुडंट कोऑर्डिनेटर साक्षी मौर्या व रुचिता चोतले यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here